electric section tenth practical (kandii kolsa).
*bio coal(कांडी कोळसा)*
*उदेद्श :- अन्न आणि इंधन या दैनंदिन गरजेच्या बाबी आहेत. परंतु सध्या इंधनाची टंचाई भासते आहे त्याचप्रमाणे इंधनाची गरजही वाढते आहे.पारंपारिक इंधने उदा. कोळसा, LPG इ. संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून परंपरागत इंधनात बदल करणे आवश्यक आहे.
साहित्य :- उसाचे पाचट , पत्र्याचा डबा ,आगपेटी,पीठ,पालापाचोळा, लोखंडी पाईप
कृती :- १) प्रथम कांडी कोळसा तयार करण्यासाठी पत्री दाबा घ्या आणि त्या डब्याला स्वच्छ करून घ्या.
२) पालापाचोळा पत्री डब्यात एकत्र करा व त्याला अर्धवट जाळा.
३) काही वेळानंतर अर्धवट जळालेला कोळसा शिल्लक राहील. (हे मिश्रण संपूर्ण जाळू नये तसे केल्यास त्याची राख होईल आणि ती राख कोळसा बनवण्यासाठी उपयोगाची ठरणार नाही
४)अर्धवट जळालेला कोळसा थंड झाल्यावर पत्री डब्यातून बाहेर काढून जमिनीवर प्लास्टिकच्या पिशवीवर पसरवावा व लोखंडी पाईप त्यावर फिरवून त्याचा बारीक भुगा करावा.
५) एका पातेल्यात पाणी तापवायला ठेवा आणि त्यात पीठ टाका व थोडावेळ उकडू द्या, पिठाचा खळ तयार होईल.मऊ भुगा तयार झाल्यावर त्यात पिठाचा खळ मिसळावा.